लवकर वस्तू पोहचविण्यासाठी अ‍ॅमेझॉनची भारतीय रेल्वेसोबत भागीदारी

अ‍ॅमेझॉनने कोरोना व्हायरसच्या काळात देशभरात ‘कोव्हिड-19 पार्सल स्पेशल ट्रेन्स’द्वारे सामान पोहचविण्यासाठी भारतीय रेल्वेसोबतची भागीदारी अधिक मजबूत केली आहे. यामुळे अ‍ॅमेझॉनला ग्राहकांपर्यंत अत्यावश्यक वस्तू लवकरात लवकर पोहचवण्यास मदत होईल. मागील वर्षी अ‍ॅमेझॉनने 13 मार्गांमध्ये ट्रांसपोर्ट पॅकेज पोहचविण्यासाठी भारतीय रेल्वेसोबत करार केला होता.

लॉकडाऊनच्या काळात देशभरात अत्यावश्यक वस्तू पाठविण्यासाठी रेल्वेच्या अनेक पार्सल स्पेशल ट्रेन्स सुरू आहेत. आता या रेल्वेचा वापर अ‍ॅमेझॉन देखील करणार आहे.

अ‍ॅमेझॉनच्या ट्रांसपोर्टेशन सर्व्हिसेसचे डायरेक्टर अभिनव सिंह म्हणाले की, कोव्हिड-19 पार्सल स्पेशल रेल्वेच्या मदतीने ग्राहकांपर्यंत वेगाने आणि पुर्ण क्षमतेने वस्तू पोहचवू शकू याचा आम्हाला विश्वास आहे.

या भागीदारीमुळे आता अ‍ॅमेझॉनच्या वस्तू 55 मार्गांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचतील. दरम्यान, मागील आठवड्यात अ‍ॅमेझॉनने लोकल शॉप्स ऑन अ‍ॅमेझॉन सेवा सुरू केली असून, याद्वारे ग्राहकांना जवळील किराणा दुकानातून सामान मिळवण्यास मदत होईल.

Leave a Comment