लॉकडाऊन मधेही एलआयसीची सरस कमाई


एलआयसी इंडियाचे नवीन पॉलिसीमधून मिळालेले १९१९-२०चे उत्पन्न २५.२ टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून आले असून कोविड १९ मुळे वास्तविक वित्तीय वर्षातील शेवटचा आणि महत्वाचा पंधरवडा व्यवसाय बंद राहूनही एलआयसीने ही कामगिरी नोंदविली आहे. या काळात एलआयसीचा बाजारातील हिस्सा वाढला आहे. पॉलिसीजचा आकडा १.१९ टक्क्याने वाढून ७५.९० टक्क्यांवर गेला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

गेली सहा वर्षे आयुर्विमा महामंडळ सातत्याने पॉलिसी विक्री मध्ये चांगली कामगिरी नोंदवीत आहे. २०१९-२० मध्ये आयुर्विमा महामंडळाने २.१९ कोटी पॉलिसी मिळविल्या असून त्यांच्या प्रीमियम मुळे एलआयसीची कमाई वाढून ५१२२७ कोटींवर गेल्याचे समजते. मार्चचा शेवटचा आठवडा लॉकडाऊन मुळे वाया जाऊनही एलआयसीने ही कामगिरी केली आहे. याच काळात महामंडळाने २.०३ कोटी मॅचुरीटी व मनी बॅक क्लेम सेटल केले आहेत आणि ७.५० लाख डेथ क्लेमही दिले असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे.

Leave a Comment