विराट,एबी डीविलीअर्स रेकॉर्ड नोंदविलेल्या बॅटसचा करणार लिलाव


फोटो साभार इनएग्झीक्यूटीव्ह
कोविड १९च्या लढाईविरोधात सर्वानीच कंबर कसली असून सेलेब्रिटीज अनेक प्रकारे आर्थिक मदत करत आहेत. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली आणि विराटचा आयपीएल रॉयल चँलेंजर बंगळूर टीमचा सहकारी, द, आफ्रिकेचा एबी डीवीलीअर्स यांनीही आता कोविड १९ साठी वेगळ्या प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे.

हे दोघे आयपीएल २०१६ मध्ये गुजराथ लायन्स विरुध्द खेळताना वापरलेले त्यांचे क्रिकेट सामान लिलावात विकणार आहेत. त्यात टी शर्ट, बॅटस आणि ग्लोव्स यांचाही समावेश आहे. या दोघांनी या सामन्यात आयपीएल मध्ये इतिहास नोंदविताना ऐतिहासिक २२९ रन्सची भागीदारी केली होती. आयपीएलच्या इतिहासात ही सर्वात मोठी भागीदारी असून त्या दोघानीही शतक केले होते. सोमवारी एबी डीवीलीअर्सने सोशल मीडियावर या संदर्भातल्या लिलावात विकल्या जाणाऱ्या वस्तूंचे फोटो विराट आणि स्वतःच्या सहीनिशी प्रसिध्द केले आहेत.

या लिलावातून जमा होणारी रक्कम भारत आणि द. आफ्रिका सरकाच्या कोविड १९ फंडासाठी दिली जाणार आहे.

Leave a Comment