मोटोरोला एज सिरीज भारतात लवकरच लाँच


फोटो साभार जागरण
गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच झालेला मोटोरोला एज सिरीज फ्लॅगशिप मोटो एज प्लस लवकरच भारतीय बाजारात दाखल होत असल्याचे मोटोरोला इंडिया प्रमुख प्रशांत मणी यांनी ट्विट केले आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स व फिचर्स मुळे हा स्मार्टफोन लाँच होण्याअगोदरच चर्चेत आला होता. विशेष म्हणजे ५ हजार एमएएचची बॅटरी असलेला पहिलाच फाईव्ह जी फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या फोनसाठी ६.७ इंची कर्वड फुल एचडी ओलेड डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर, अँड्राईड १० ओएस, १२ जीबी पर्यंत रॅम, २५६ जीबी पर्यंत स्टोरेज दिले गेले आहे. पंचहोल डिझाईनमध्ये रिअर ला १०८ एमपीचा प्रायमरी कॅमेरा, १६ एमपीचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि ८ एमपीचे टेलिफोटो लेन्स असा ट्रिपल कॅमेरा सेट आहे तर सेल्फी साठी २५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट करणारी बॅटरी आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.

हा फोन युरोपीय बाजारात ७६४०० रुपये बेसिक प्राईजला मिळत असून भारतात त्याची किंमत किती असेल हे अजून जाहीर केले गेलेले नाही.

Leave a Comment