दुधीभोपळ्याचा रस अतिप्रमाणात घेतल्यास होऊ शकते आरोग्य हानी


दुधी भोपळ्याचा रस आरोग्यासाठी खुपच लाभदायी आहे आणि हा रस नियमित सेवन केल्याचे फायदेही खूप आहेत. या रसाच्या सेवनाने वजन कमी करणे, पित्त कमी करणे, हृदय विकार, मधुमेह नियंत्रित करणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढणे या सारखे अनेक फायदे मिळतात. मात्र या रसाचे प्रमाणाबाहेर सेवन केले जात असेल तर हे फायदे दूर, उलट आरोग्याची हानी होण्याची शक्यता अधिक वाढते असा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.


या रिपोर्ट नुसार सकाळी अनोश्यापोटी दुधीचा रस फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात हा रस घेतला तर त्याचे तोटे आहेत. कच्च्या दुधीचा हा रस अनोश्यापोटी अतिप्रमाणात प्यायल्यास पोटासाठी ते धोकादायक ठरते. कारण हे भोपळे आकाराने मोठे व्हावेत म्हणून त्यावर पेस्टीसाईड फवारली जातात किंवा भोपळ्यात ऑक्सीटोसीन या द्रव्याची इंजक्शन दिली जातात. यामुळे अनेकांना अॅलर्जी येऊ शकते, हातापायांना सूज येऊ शकते, नाक आणि चेहऱ्यावर फोड येऊन खाज सुटू शकते. भूक कमी होते.

मधुमेही लोकांनी हा रस अधिक प्रमाणात घेतल्यास रक्तशर्करेचे प्रमाण एकदम कमी होऊन माणूस बेशुध्द होऊ शकतो. हा रस प्रमाणात घेतल्यास इन्शुलिनची पातळी योग्य राखली जाते पण जादा प्रमाणात घेणे धोकादायक ठरू शकते. दुधी रस काढल्यावर तो कडू लागत असेल तर अजिबात पिऊ नये तसेच फारतर एक ग्लास रस इतकेच प्रमाण ठेवावे. काढून ठेवलेला रस पिऊ नये तर दरवेळी ताजा काढून प्यावा असेही सुचविले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment