एप्रिल मध्ये विकली गेली नाही एकही कार


फोटो साभार फायनान्शियल एक्सप्रेस
देशात कोविड १९ चा प्रसार आणि त्यामुळे जाहीर केल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. याचा सर्वाधिक फटाका ऑटो सेक्टरला बसला असून एप्रिल महिन्यात कुठल्याच ऑटो कंपनीची एकही कार विकली गेली नसल्याचे आकडेवारी सांगते. ऑटो इंडस्ट्रीच्या इतिहासात प्रथमच अशी परिस्थिती आल्याचेही सांगितले जात आहे.

देशात सर्वाधिक कार्स विकणाऱ्या मारुती सुझुकी पासून ते मर्सिडीज, स्कोडा अश्या महागड्या कार्स विकणाऱ्या कंपन्यांना हाच अनुभव आला आहे. इतकेच नव्हे तर मे महिन्यातही परिस्थितीत फारशी सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचेही सांगितले जात आहे. लॉक डाऊनमुळे बहुतेक सर्व कार्स शोरुम्स बंद आहेत. त्यामुळे दीर्घकाळ कार्स उत्पादक कंपन्यांना या संकटाचा सामना करावा लागेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर. सी भार्गव या संदर्भात बोलताना म्हणाले कोविड १९ देशात काय प्रगती करतो यावर पुढचे चित्र अवलंबून असेल. स्कोडाचे हेड जॅक हॅलीस यांनीही ट्विट करून एप्रिल महिन्यात एकही कार विकली गेली नसल्याचे आणि त्याच्या ३० वर्षाच्या करियर मध्ये प्रथमच अशी वेळ आल्याचे नमूद केले आहे. या व्यवसायात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ४ कोटी लोक काम करतात आणि या उद्योगाचे. देशाच्या जीडीपी मध्ये ८ टक्के तर महसूल कलेक्शन मध्ये १५ टक्के योगदान आहे. मारुती सुझुकीच्या विक्रीत गेल्या तिमाहीत ४६ टक्के घट नोंदविली गेली आहे.

Leave a Comment