आता येणार वाय-फाय 7, देणार 30000Mbps इंटरनेट स्पीड

आजकाल सर्व युजर्सला हाय-स्पीड इंटरनेट हवे आहे. भारतात सध्या सेल्यूलर आणि वाय-फाय नेटवर्क 1Gbps पर्यंतचा स्पीड मिळत आहे. जर हा स्पीड देखील तुम्हाला कमी वाटत असेल, तर लवकरच 30Gbps पर्यंतचा इंटरनेट स्पीड तुम्हाला मिळू शकतो.

30Gbps ची स्पीड तुम्हाला वाय-फाय 7 मध्ये मिळेल. हा स्पीड सध्याच्या वाय-फाय 6 पेक्षा तीनपट अधिक आहे. वाय-फाय राउटर अधिकतर स्पीड 9.6Gbps पर्यंतचा स्पीड देते.

वाय-फाय 7 सध्या डेव्हलप करण्यात येत आहे. वाय-फाय 7 मध्ये CMU-MIMO टेक्नोलॉजी देण्यात येईल, जी 16 डेटा स्ट्रीमला स्पोर्ट करते.

वाय-फाय 5 (802.11 ac) वायरलेस ट्रांसमिशन प्रोटोकॉलच्या तुलनेत वाय-फास 6 40 टक्के वेगवान आणि कमी पॉवर खर्च करते. वाय-फाय 6 राउटरशी एकावेळी अनेक डिव्हाईस कनेक्ट होऊ शकतात. यात लेटेस्ट डब्ल्यूपी3 सिक्युरिटी प्रोटोकॉल असल्याने हॅक करणे अवघड आहे.

सर्वसाधारण वाय-फाय 2.4Ghz आणि 5 Ghz बँडवर काम करतात. मात्र वाय-फाय 7 मध्ये 6Ghz फ्रिक्वेंसी बँड सपॉर्ट मिळेल. वाय-फाय 6 सध्या 1024 QAM सिग्नल मॉड्यूलेशनचा वापर करते. तर वाय-फाय 7 मध्ये 4096 QAM सिग्नल मॉड्यूलेशन असेल. हे इंटरनेटचा ट्रांसमिशन स्पीड वाढवून 30Gbps करते.

Leave a Comment