झूमला टक्कर देण्यासाठी टेलिग्राम आणणार सुरक्षित ग्रुप व्हिडीओ कॉलिंग

लॉकडाऊनमुळे मागील काही दिवसात व्हिडीओ कॉलिंगची लोकप्रियता वाढली आहे. यात सर्वाधिक झूम अ‍ॅप लोकप्रिय ठरले आहे. यापाठोपाठ व्हॉट्सअ‍ॅपने देखील ग्रुप कॉलिंगची लिमिट वाढवली आहे. गुगल ड्युओने देखील काही बदल केले असून, आता टेलिग्राम देखील ग्रुप कॉलिंग फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

टेलिग्राम एक सुरक्षित इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप समजले जाते. या अ‍ॅपमध्ये सध्या ग्रुप व्हिडीओ कॉलिंगचे फीचर नाही. मात्र आता लवकरच हे फीचर अ‍ॅपमध्ये मिळू शकते. याबाबत कंपनीने सांगितले की या वर्षीच टेलिग्राममध्ये  ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर जोडले जाणार आहे.

कंपनीने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले की, सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीने विश्वासहार्य व्हिडीओ कम्युनिकेशनची गरज असल्याचे दर्शवले आहे. 2020 मध्ये व्हिडीओ कॉलिंग तसेच झाले आहे, जसे 2013 मध्ये मेसेजिंग होते. आम्ही 2020 मध्ये सिक्योर ग्रुप व्हिडीओ कॉल्स आणण्याचा विचार करत आहोत.

मात्र हे फीचर कोणत्या महिन्यात लाँच होणार हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, टेलिग्रामचे जगभरात 40 कोटी युजर्स आहेत.

Leave a Comment