मुंबई पोलीस आणि थॉर का सांगत आहेत ‘प्रमाण दो’

मुंबई पोलीस नागरिकांना एखादे महत्त्वाचे आवाहन करताना अनेकदा मिम्स, जोकची मदत घेत असते. युजर्सला देखील मुंबई पोलिसांची ही हटके पद्धत अनेकदा भावते. सध्या कोरोना व्हायरसच्या काळात नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये यासाठी मुंबई पोलीस सोशल मीडियाच्या मदतीने जागृकता पसरवता आहे.

मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा अशाच हटके पद्धतीने लॉकडाऊनमध्ये बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सोबत घराच्या बाहेर पडताना पुरावा देखील जवळ बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे यासाठी पोलिसांनी नेटफ्लिक्सवर नुकताच रिलीज झालेल्या एक्सट्रॅक्शन चित्रपटातील डायलॉग वापरला आहे. चित्रपटात अभिनेता क्रिस हेम्सवर्थचा बांगला डायलॉग लोकप्रिय झाला आहे.

पोलिसांनी क्रिस हेम्सवर्थचा फोटो शेअर करत लिहिले की, घरातून बाहेर पडण्यापुर्वी तुमच्याकडे पुरावा असेल याची खात्री करा. कारण मोलभाव करत नाही. सोबतच क्रिम हेम्सवर्थच्या फोटोसह प्रसिद्ध बांगला डायलॉग ‘प्रमाण दो’ (पुरावा द्या) वापरला आहे.

https://twitter.com/anandicted/status/1254663882334801920

नेटकऱ्यांना देखील मुंबई पोलिसांची जागृकता पसरवण्याची हटके पद्धत आवडली. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment