लॉकडाऊनमुळे भरले ओझोनमध्ये पडलेले भलेमोठे छिद्र

लॉकडाऊन भलेही मनुष्यासाठी त्रासदायी ठरत असला तरी प्राणी, पर्यावरण यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला वैज्ञानिकांनी उत्तर ध्रुवाच्या वरील ओझोनच्या थरात 10 लाख वर्ग किमीचे छिद्र पाहिले होते. हे इतिहासातील सर्वात मोठे छिद्र होते. मात्र लॉकडाऊनमध्ये कमी झालेल्या प्रदुषणामुळे हे छिद्र भरले आहे.

पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या वरती ओझोनचा थर आहे. याआधी दक्षिण ध्रुवाच्या ओझोन थराचे छिद्र कमी धाल्याचे समोर आले होते. उत्तर ध्रुव म्हणजे आर्कटिकचे क्षेत्र. येथे एक ताकदवर पोलर वर्टेक्स बनले होते. जे आता नष्ट झाले आहे. उत्तर ध्रुवाच्या वरती स्ट्रेटोस्फेयरवरील ढगांमुळे ओझोनचा थर पातळ होत होता.

ओझोनचा थर कमी होण्यामागे ढग, क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हायड्रोक्लोरोप्लोरोकार्बन्स हे तीन मुख्य कारण आहेत. या तिन्हींचे प्रमाण स्ट्रेटोस्फेयरमध्ये वाढले होते. यामुळे स्ट्रेटोस्फेयरमध्ये सुर्याची अल्ट्रावायलेट किरणं धडकतात, तेव्हा क्लोरिन आणि ब्रोमीन एटम निघत असे. हेच एटम ओझोनच्या थराला कमी करत होते.

नासाच्या वैज्ञानिकांनुसार, अशी स्थिती यंदा उत्तर ध्रुवाच्या वरती ओझोन थरात पाहण्यास मिळाली नाही.

स्ट्रेटोस्फेयरचा थर पृथ्वीच्या 10 ते 50 किमी वरती आहे. याच्याच मध्यभागी ओझोनचा थर असतो, जो पृथ्वीवरील जीवांना सुर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांपासून वाचवतो.

ओझोनच्या थराचा अभ्यास करणारे कॉपनिकस एटमॉस्फेयर मॉनिटरिंग सर्व्हिसचे संचालक विनसेंट हेनरी पिउच म्हणाले की, आपल्याला प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र यंदा ओझोनमध्ये जे छिद्र झाले आहे, तेव्हा सर्व वैज्ञानिकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. अखेर लॉकडाऊनमुळे क्लोरिन आणि ब्रोमीनचा स्तर कमी झाला असून, ओझोनच्या थरात झालेले छिद्र भरले आहे.

Leave a Comment