टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि रिलायन्स जिओला प्रीपेड प्लॅनची वैधता वाढवण्यास मनाई केली आहे. नवीन दिशानिर्देश जारी करण्यास नकार देण्यात आला आहे.
लॉकडाऊन : टेलिकॉम कंपन्या आता वाढवणार नाही प्लॅनची वैधता
याआधी ट्रायने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना विना अडथळा टेलिकॉम सेवा देण्यासाठी कंपन्यांना एक प्रीपेड रिचार्ज पॅटर्नला सबमिट करण्यास सांगितले होते.
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्राय परिस्थितीकडे लक्ष ठेऊन असून, त्यानंतर कंपन्यांशी संपर्क साधेल.
लॉकडाऊन वाढल्यानंतर भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने आपल्या प्रीपेड युजर्सच्या प्लॅन्सची वैधता वाढवली होती. सोबतच 10 रुपयांचा टॉक-टाईम देखील प्रीपेड ग्राहकांच्या अकाउंटमध्ये जमा केला होता. बीएसएनएलने देखील आपल्या ग्राहकांना अशाच प्रकारची सेवा दिली.
लॉकडाऊन दुसऱ्या टप्प्यात वाढल्यानंतर पुन्हा एकदा कंपन्यांनी वैधता 3 मे पर्यंत वाढवली होती. व्होडोफान-आयडियाने आपल्या 9 कोटी, तर जिओने आपल्या सर्वच ग्राहकांच्या प्लॅनची वैधता वाढवली होती.