लॉकडाऊनच्या नियमांची एैशीतैशी करत येथे हजारोंची पार्टीला उपस्थिती

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असले तरी याचा सर्वाधिक फटका अमेरिकाला बसला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. असे असले तरी देशात लॉकडाऊनच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रदर्शन होत आहे. नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही.

शिकागो येथे तर तब्बल 1 हजार पेक्षा अधिक युवक-युवती पार्टीमध्ये सहभागी झाल्याची घटना समोर आली आहे. पार्टी करण्यासाठी हे सर्व एका अपार्टमेंटमध्ये जमा झाले होते.

एवढेच नाहीतर या पार्टीचे सोशल मीडियावर लाईव्ह प्रक्षेपण देखील केले. तरुण-तरूणी दारू पिऊन डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर अनेकांना यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

https://www.facebook.com/100001211358701/videos/3108523795864635/

फेसबुकवर लाईव्ह करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत 20 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आलेले आहे.

पार्टीमध्ये काहीजण मास्क घातलेले देखील दिसत आहे. मात्र सोशल डिस्टेंसिंगचे कोणतेही पालन होताना दिसत नाही. शिकागो हे अमेरिकेच्या इलिनॉयस या राज्यात येते. येथे कोरोनाग्रस्तांची संख्या 40 हजारांपेक्षा अधिक आहे.

शिकागोचे महापौर लोरी लाइटफूट यांनी लॉकडाऊनचे नियम सख्त ठेवले आहेत. महापौर म्हणाले की, पार्टीचा व्हिडीओ पाहिला असून, हे पुर्णपणे अस्विकार्य आहे.

Leave a Comment