या क्षेत्रांना 6 महिन्यांसाठी मिळू शकते जीएसटीमध्ये सूट

कोरोना व्हायरस महामारीमुळे सर्वाधिक फटका बसलेले रेस्टोरेंट, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटी सारख्या सेक्टर्ससाठी केंद्र सरकार जीएसटी मदत पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. या मदत पॅकेज अंतर्गत सर्वाधिक फटका बसलेल्या सेक्टर्सला 6 महिन्यांसाठी जीएसटीमध्ये सुट मिळू शकते. तसेच रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांसाठी जीएसटी दर कमी केला जाऊ शकतो. इंडिया टुडेने या संदर्भात वृत्त दिले आहे.

जीएसटी काउंसिलकडून अंतिम मंजूरी मिळाल्यानंतरच हे मदत पॅकेज जाहीर केले जाईल. याचा फायदा जीएसटी भरू न शकणाऱ्या अनेक छोट्या उद्योग-धंद्यांना देखील होणार आहे. याशिवाय सेवा सेक्टर्सच्या थकबाकीत देखील सुट मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, सरकार कॅश सिस्टमवर आधारित जीएसटी लागू करण्याचा विचार करत आहे. सध्या इनवॉइस आधारित सिस्टमवर टॅक्स आकारला जातो. यामुळे जेव्हा रोख रक्कम येईल, तेव्हाच जीएसटी भरावा लागेल.

राज्य सरकारच्या इनपूटच्या आधारावर आता जीएसटी काउंसिलला या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. याशिवाय सरकार उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी देखील आर्थिक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment