बीएसएनएल युजर्सला मोफत देत आहे 5 जीबी डाटा, असा घ्या लाभ

टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने मागील महिन्यात वर्क फ्रॉम होम इंटरनेट प्लॅनची घोषणा केली होती. या प्लॅन अंतर्गत युजर्सला एक महिना 5जीबी इंटरनेट डाटा मोफत देण्यात येत होता. मात्र आता कंपनीने या प्लॅनचा कालावधी 19 मे पर्यंत वाढवला आहे.

कंपनीच्या तामिळनाडू टेलिकॉम सर्कलद्वारे ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला 110Mbps स्पीडद्वारे 5 जीबी डाटा दिला जात आहे. जरी युजरने 5 जीबी डाटा वापरला तरी मोफत अनलिमिटेड इंटरनेट कमी स्पीडमध्ये सुरूच राहील.

बीएसएनएलचा हा प्लॅन ब्रॉडबँड आणि लँडलाईन युजर्सला मिळत आहे. युजर्स टोल फ्री नंबर 1800-345-1504 वर कॉल करून हा प्लॅन मिळवू शकतात.

दरम्यान, बीएसएनएलने आपल्या सर्व प्रीपेड युजर्सच्या प्लॅन्सचा कालावधी 5 मे पर्यंत वाढवला आहे.

Leave a Comment