जिओमार्टला टक्कर देण्यासाठी आता अ‍ॅमेझॉननेे आणले ‘लोकल शॉप्स’

भारतातील जवळपास 7 कोटी किरकोळ दुकानदारांवरील वर्चवस्वासाठी ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये युद्ध सुरू होणार आहे. रिलायन्स जिओने या दुकानदारांपर्यंत पोहण्यासाठी जिओमार्टची सुरूवात केली असून, आता अ‍ॅमेझॉन इंडियाने ‘लोकल शॉप्स ऑन अ‍ॅमेझॉन’ प्रोग्राम लाँच केला आहे.

अ‍ॅमेझॉन इंडियाचे सेल्स सर्व्हिसचे वॉइस प्रेसिडेंट गोपाल पिल्लई या प्रोग्रामची घोषणा करताना म्हणाले की, ‘लोकल शॉप्स ऑन अ‍ॅमेझॉन’ प्रोग्राम अंतर्गत प्रत्येक विक्रेत्याला भारत आणि जगातील ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

काही दिवसांपुर्वीच फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये मोठा गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. रिलायन्सने व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने जिओमार्टची सुरूवात देखील केली आहे.

काही दिवसांपुर्वीच किरकोळ व्यापाऱ्यांचे संघटन कंफडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दुकानदारांसाठी ‘ई-लाला’ पोर्टल लाँच केले होते. या संघटनेशी 7 कोटी दुकानदार आणि 40 हजार ट्रेड असोसिएशन जोडलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये ग्राहकांपर्यंत सामान पोहचविण्यासाठी या प्रोजेक्टची सुरूवात केली आहे.

अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे की, त्यांचा प्रोग्राम स्थानिक आणि रिटेलर्सचे सशक्तीकरण करतो. जेणेकरून उपलब्ध संसाधनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहचता येईल. यासाठी कंपनीने खास डिलिव्हरी अ‍ॅप तयार केला आहे.

कंपनी माहील 6 महिन्यांपासून 5 हजारांपेक्षा अधिक दुकानादारांसोबत मिळून बंगलुरु, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, जयपुर, अहमदाबाद, कोयंबतूर, सुरत, इंदुर, लखनऊ, सहारनपुर, फरीदाबाद, कोटा आणि वाराणसी शहरांमध्ये पायलट प्रोजेक्ट चालवत आहे.

Leave a Comment