भारताच्या आरोग्य संशोधन बजेटपेक्षा अधिक आहे सुंदर पिचाई यांचा पगार

मूळ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे गुगलचे सीईओ आणि त्याची प्रमुख कंपनी अल्फाबेटचे सीईओ आहेत. पिचाई हे दरवर्षी पगारच्या बाबतीत नवीन उंची गाठत आहे. सध्या अल्फाबेट इंकने त्यांच्या पगाराबाबत आकडे सार्वजनिक केले आहेत.

अल्फाबेटने खुलासा केला की, कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांना वर्ष 2019 मध्ये एकूण 28.1 कोटी डॉलर म्हणजेच 2,144.53 कोटी रुपये पगार मिळाला. याद्वारे पिचाई सर्वाधिक पगार मिळवणारे सीईओ झाले आहेत.

सुंदर पिचाई यांनी गुगल आणि अल्फाबेटकडून जेवढा पगार मिळत आहे, त्यापेक्षा कमी भारताचे वार्षिक आरोग्य संशोधन बजेट आहे. भारत सरकारने 2020-21 साठी आरोग्य संशोधनासाठी 2122 कोटी रुपये बजेट निर्धारित केले आहे. यातील 85 टक्के इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला देण्यात आले आहेत.

अल्फाबेटने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी पिचाई यांचा पगार वाढून 20 लाख डॉलर (15.26 कोटी रुपये) होईल. पिचाई यांचा पगार अल्फाबेट कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या तुलनेत 1085 पट अधिक आहे. त्यांच्या पगाराचा मुख्य भाग हा कंपनीच्या स्टॉकवर निर्धारित करतो.

पिचाई यांना 2018 मध्ये एकूण 19 लाख डॉलर्स (135 कोटी रुपये) वेतन-भत्ता मिळाला होता. यात 6.5 लाख डॉलर (4.6 कोटी रुपये) बेसिक पगार होता. मागील वर्षी पिचाई यांना अल्फाबेटचे सीईओ म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.

Leave a Comment