… म्हणून पंजाबमधील सर्व पोलिसांनी लावली ‘हरजीत सिंह’ नावाची प्लेट

काही दिवसांपुर्वी पटियाला येथे कर्फ्यू पासवर निहंगा समुदायातील काही लोकांनी सहायक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तोडला होता. आता हरजीत सिंह यांना पंजाब पोलिसांना अनोखा सन्मान दिला आहे.

एसआय हरजीत सिंह यांच्या सन्मानात पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांच्यासह 80 हजार पोलीस कर्मचाऱ्यांनी नावाच्या पाटीवर सोमवारी हरजीत सिंह यांच्या नावाची पट्टी लावली. सर्व कर्मचारी हरजीत सिंह यांचे नाव लावून काम करत आहेत. सोबतच ‘मी देखील हरजीत सिंह’चा नारा देत आहेत.

सध्या हरजीत सिंह हे हॉस्पिटलमध्ये असून, 8 तासांच्या सर्जरीनंतर डॉक्टरांना त्यांचा हात जोडण्यात यश मिळाले होते.

नाकाबंदीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त एका टीमने शहरात मार्च देखील काढला. यावेळी ‘मी देखील हरजीत सिंह’चे नारे देत लोकांना सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

हॉस्पिटलमध्ये असलेले हरजीत सिंह म्हणाले की, हा त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता की आयुष्यभर लक्षात राहणारा असा सन्मान मिळेल. त्यांनी डीजीपी,एसएसपीसह सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Comment