इफ्तार पॅराडाइज, मुंबईचा मोहम्मद अली रोड सुना सुना


फोटो साभार द स्टेट
देशात मुस्लीम समाजाचा पवित्र महिना रमजान सुरु झाला असला तरी कोविड १९ च्या साथीमुळे इफ्तार पॅराडाइज अशी देश विदेशात ओळख मिळविलेला मुंबईचा प्रसिद्ध मोहम्मद अली रोड यंदा एकदम सुना सुना आहे. या ठिकाणी रमजानच्या दिवसात केवळ मुंबईतीलच नाही तर परदेशातूनही लोक खास येथील एक सो एक चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात. आणि विशेष म्हणजे त्यात केवळ मुस्लीमच नसतात तर गैर मुस्लीम लोकही तेवढ्याच संख्यने येतात. येथील गर्दी, गडबड, विविध प्रकारचे दरवळ यामुळे या दिवसात हा भाग जणू नंदनवन बनतो.


फोटो साभार प्रेस जर्नल
या रोडवरील अरुंद गल्ल्यातून रमजान काळात मोठी सजावट आणि लायटिंग केलेले असते. भेंडीबाजार, झव्हेरी बाजार ते मांडवी पर्यंत ५ किमीच्या या परिसरात या दिवसात रोज किमान १०० कोटीचा व्यवसाय होतो. अत्तरे, मेवा, मिठाई, गारमेंट, हॉटेल्स, बेकरी अशी अनेक दुकाने येथे आहेत शिवाय खाऊ गल्लीत शोर्मा, कबाब, मुगलाई चिकन, सूप अश्या अनेक चविष्ट पदार्थांबरोबर मालपूआ, रबडी, मावा, जिलेबी, फिरनी, बिर्याणी, बैदा रोटी अशी एकसो एक पक्व्वाने लोकांना आकर्षित करत असतात. या काळात येथे अरब देशातूनही व्यापारी येतात. दररोज २०० कोटीची उलाढाल या दिवसात होते. मात्र यंदा लॉक डाऊन मुळे येथे केवळ शांतता आहे. रस्ते ओस आहेत आणि व्यापारी लोकांना मोठे नुकसान सोसावे लागते आहे.

Leave a Comment