आता उत्सुकता पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या उल्कापिंडाची


फोटो साभार नई दुनिया
येत्या २९ एप्रिल रोजी पृथ्वीच्या जवळून एक प्रचंड मोठ्या आकाराचा आणि अतिशय वेगवान उल्कापिंड जाणार असून वैद्यानिक आणि त्यात रुची असलेल्या अन्य लोकांसाठी हे मोठे आकर्षण ठरले आहे. यापूर्वी ही उल्का पृथ्वीला टक्कर देईल असे सांगितले जात होते मात्र नासा ने ही उल्का अत्यंत वेगाने पृथ्वीजवळून जाईल पण पृथ्वीला टक्कर देणार नाही असे स्पष्ट केले आहे.

या उल्कापिंडाची रुंदी १.२ मैल आहे. विजेच्या वेगाने तो २९ एप्रिल रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पृथ्वीच्या जवळून जाईल. त्याचा वेग प्रती तास १९ हजार किलोमीटर इतका आहे. या उल्कापिंडाचा एक अगदी ताजा फोटो नुकताच प्रसिद्ध झाला असून नवल म्हणजे तो मास्क लावलेल्या चेहऱ्यासारखा दिसत आहे. त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर पृथ्वी आणि चंद्र याच्या अंतरापेक्षा १५५८ पट अधिक आहे. पृथ्वी आणि चंद्र याच्यातील अंतर ३ लाख किलोमीटर आहे. या उल्केचा शोध १९९८ मध्येच लागला होता म्हणून तिचे नामकरण १९९८ ओआर २ असे केले गेले आहे.

ही उल्का ५९ वर्षानंतर म्हणजे २०७९ साली पुन्हा पृथ्वीच्या जवळून जाईल तेव्हा मात्र ती धोकादायक ठरू शकते. कारण त्यावेळी तिचे पृथ्वीपासूनचे अंतर खुपच कमी असणार आहे असेही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment