या बॉलीवूड तारका आहेत या क्रिकेटपटूच्या क्रश


फोटो साभार जागरण
भारतात क्रिकेटपटूची लोकप्रियता वर्णनातीत आहे. कित्येक भारतीय क्रिकेटपटू विदेशातही लोकप्रिय आहेत. त्यांचे कोट्यवधी फॅन्स आहेत. मात्र जगभर प्रसिद्ध असलेल्या या क्रिकेटपटूना कोणत्या भारतीय तारका विशेष आवडतात हे ऐकणे मोठे मनोरंजक आहे.

टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने बॉलीवूड अभिनेत्री आणि सौंदर्यवती अनुष्का शर्मा हिच्या बरोबर विवाह केला आहे. मात्र त्याची आवडती तारका अनुष्का नाही तर ती आहे बच्चन कुटुंबाची लाडकी सून ऐश्वर्या राय. विराट तिच्या सौंदर्याचा दिवाना आहे. कारण शेवटी बायको वेगळी आणि आवड वेगळी. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याचे नाव काही काळापूर्वी नगमा या नटीशी जोडले गेले होते. मात्र त्याची आवडती अभिनेत्री आहे मस्त गर्ल रवीना टंडन.


फोटो साभार एनडीटीव्ही
धुवाधार फलंदाज रोहित शर्माचा चाहता वर्ग मोठा आहे. त्याला स्वतःला मात्र बेबो म्हणजे करीना कपूर अतिशय प्रिय आहे. एका मुलाखतीत त्यानेच ही बाब उघड केली होती. तो म्हणतो करीना फारच सुंदर आहे आणि तिचे सगळे चित्रपट तो पाहतो. मी तिच्यासाठी अगदी वेडा आहे असेही त्याने सांगितले आहे. युवा खेळाडू के एल राहुल याचे नाव सुनील शेट्टीची मुलगी अथिया हिच्याबरोबर चर्चेत असले तरी दिशा पाटणी त्याची क्रश आहे.


फोटो साभार देशी ह्युमर
युवराज सिंग याने बॉलीवूड अभिनेत्रीशी विवाह केला असला आणि त्याचे नाव यापूर्वी अनेक बॉलीवूड ताराकांबरोबर जोडले गेले असले तरी त्याची क्रश आहे आपली मराठमोळी काजोल. काजोल सोबतची एक सेल्फी युवराजने मागेच शेअर केली होती. आजही काजोल हीच युवराजची क्रश आहे.

Leave a Comment