लॉकडाऊनमुळे भारतातील पर्यावरणाने घेतला मोकळा श्वास; ‘नासा’ने शेअर केला फोटो


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक गोष्टी वगळता कारखाने, ऑफिस, गाड्या, वाहतूक अशा सर्वच गोष्टी लॉकडाऊनमध्ये बंद असल्यामुळे आपल्या हवामान, वातावरण, पर्यावरणावर याचा चांगला, सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. घरातील दरवाजे-खिडक्यांमधून येणारी हवा अधिक स्वच्छ आणि सुरक्षित झाली आहे. भारताला एक सुखद धक्का देणारा फोटो अमेरिकी अंतराळा संस्था ‘नासा’ने शेअर केला आहे.

नुकताचा भारताचा एक फोटो ‘नासा’ने शेअर केला आहे. 2016 ते 2020 मधील छायाचित्रांद्वारे, भारतात धूळ-मातीचा, प्रदूषणाचा स्तर पूर्णपणे कमी झाल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. 2016 मध्ये सॅटेलाईटद्वारा घेण्यात आलेल्या फोटोत संपूर्ण भारतभरात केवळ धूळ, माती, प्रदूषणाचा थर असल्याचे दिसत होते. तर आता लॉकडाऊन सुरु झाल्यापासून भारत, भारतातील जमिन अतिशय स्वच्छ दिसत असल्याचे ‘नासा’ने शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे.

लॉकडाऊन अनेक मार्गांनी फायदेशीर ठरत असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले आहे. कारखाने बंद असल्यामुळे नद्याचे पाणी स्वच्छ झाले आहे. रखडलेल्या बांधकामांमुळे वातावरणातील धूळ-माती अतिशय कमी झाली आहे. त्याशिवाय वाहने आणि कारखान्यांमधून निघणारा धूर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने, हवेची गुणवत्ता बऱ्याच अंशी सुधारली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भारतात लॉकडाऊन आहे. सर्वकाही बंद असल्याने कामकाजही ठप्प आहे. मात्र यामुळे पर्यावरणाला फायदा झाला आहे. हवेचा स्तर, गुणवत्ता सुधारली आहे. तर झाडे-झुडपेही चांगली वाढताना दिसत आहेत.

Leave a Comment