गैर कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहचवणार ओला-उबर

कोरोना नसलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यासाठी दिल्ली सरकारने ओला आणि उबरची सोय केली आहे. यामुळे कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचण्यास मदत मिळेल. यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका हेल्पलाईन नंबर 102 आणि 112 वर कॉल करावा लागेल. दिल्ली सरकारने या संदर्भात दोन्ही कॅब कंपन्यांशी करार केला आहे.

दिल्ली सरकारच्या अधिकांश रुग्णवाहिका सध्या कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळत नाही. याशिवाय लॉकडाऊनमुळे सर्व सार्वजनिक सुविधा देखील बंद आहेत. त्यामुळे सरकारने कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहचविण्यासाठी कॅब कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, संकटाच्या काळात ओला आणि उबर कंपन्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोहचवण्यासाठी पुढे आल्या आहेत. नागरिक इमर्जेंसीमध्ये हेल्पलाईन नंबर 102 आणि 112 वर फोन करू शकतात.

Leave a Comment