BS-6 महिंद्रा स्कॉर्पियोचे बुकिंग सुरू, एवढ्या रुपयात करू शकता बुकिंग

महिंद्राने आपली लोकप्रिय एसयूव्ही स्कॉर्पियोच्या बीएस-6 मॉडेलचे ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. या नवीन स्कॉर्पियोचे बुकिंग अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटद्वारे करता येणार आहे. स्कॉर्पियो व्यतिरिक्त कंपनी महिंद्रा एक्सयूव्ही 500, बोलेरो, केयूव्ही100 एनएक्सटी आणि अल्ट्रास जी4 च्या बीएस-6 मॉडेल्सची बुकिंग सुरू केली आहे.

महिंद्राने नवीन बीएस-6 स्कॉर्पियोची माहिती वेबसाईटवर दिली आहे. मात्र अद्याप किंमतीचा खुलासा केलेला नाही. नवीन स्कॉर्पियो एस5, एस7, एस9 आणि एस11 व्हेरिएंटमध्ये येईल.

Image Credited – drivespark

ग्राहक स्कॉर्पियोला एक्सेसरीजसोबत देखील बुक करू शकतात. यात बॉडी-हगिंग बंपर, फॉग लॅम्प गार्निश सेट, डेकल्स, पार्किंग कव्हर, एलॉय व्हिल्ज, हेडरेस्ट-माउंटेड डीवीडी टचस्क्रीन, स्कफ प्लेट्स आणि कारपेट मॅटसारख्या एक्सेसरीज आहेत.

स्कॉर्पियोच्या लूकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अपडेटेड मॉडेलमध्ये 7-स्लॉट ग्रिल, मोठे प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी गाइड लाइट्स, क्रोम एक्सेंट्ससोबत राउंड फॉग लॅम्प्स, हुड स्कूप, 5-स्पोक 17-इंच एलॉय व्हिल्ज, टर्न इंडिकेटर्ससोबत साइड रिअर व्ह्यू मिरर्स आणि रेड लेंस एलईडी टेल लॅम्प्स देण्यात आलेले आहे.

Image Credited – Jagran

इंटेरियरबद्दल सांगायचे तर यात डार्क फॅब्रिक इंसर्ट्ससोबत प्लश फॉक्स लेदर इंटेरियर मिळेल. ऑडिओ आणि क्रूज कंट्रोल्ससह फॉक्स लेदर फिनिशिंग स्टेयरिंग व्हिल आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी 7 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, एयूएक्स-आयएन, जीपीएस नेव्हिगेशनसोबत यूएसबी कनेक्टिव्हिटी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी वेंट्स सारखे फीचर मिळतील.

Image Credited – drivespark

अपडेटेड स्कॉर्पियोमध्ये बीएस-6 कम्प्लायंट 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. जे 38bhp पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करते. S5 व्हेरियंटमध्ये या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल, तर अन्य व्हेरियंटमध्ये 6-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स मिळेल.

Leave a Comment