किमपेक्षा खतरनाक असणारी त्याची बहिण बनू शकते उत्तर कोरियाची हुकुमशहा

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची तब्येत खराब असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्यतिरिक्त आणखी एक नाव चर्चेत आहे. हे नाव किम जोंग यांची बहिण किम यो जोंग हे आहे. सांगण्यात येत आहे की किम जोंग यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहिण देशाची प्रमुख होऊ शकते. असे झाल्यास जोंग जगातील पहिल्या महिला हुकुमशहा ठरतील. त्या किम जोंग यांच्या पेक्षा अधिक क्रूर असल्याचे सांगितले जाते.

Image Credited – navbharattimes

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, यो जोंग या महत्त्वाच्या मुद्यांपासून ते पक्षातील लोकांना सन्मानाने आणि भितीने राहण्यास सांगत असे. त्यांना वॉइस डायरेक्टरचे पद मिळाले नसले तरी त्यांचा दर्जा तोच आहे.

Image Credited – navbharattimes

ऑर्गनायझेशन अँड गाइडेंस डिपार्टमेंटमधील त्यांच्या वाढत्या शक्तीमुळे त्यांना उत्तर कोरियातील दुसरी सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनवले. त्या अनेक वर्ष यासाठी मेहनत घेत आहेत.

Image Credited – navbharattimes

किम यो जोंग यांनी नेहमीच आपल्या भावाच्या पाठीशी राहत स्वताची जागा बनवली आहे. जोंग उन यांनी देखील बहिणीचे पद वेळोवेळी वाढवले आहे. त्यामुळेच उत्तर कोरियाच्या राजकारणात यो जोंग या महत्त्वाच्या ठरतात.

Image Credited – navbharattimes

उत्तर कोरियाच्या लाईव्ह सैन्य अभ्यासाला दक्षिण कोरियाने विरोध केल्यानंतर किम यो जोंग म्हणाल्या होत्या की, घाबरलेले कुत्रे भुकत आहेत. उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील संबंध चांगले होतील, असेही यो जोंग म्हणाल्या होत्या.

Leave a Comment