5.6 कोटींची शानदार ‘बेंटले प्लाईंग स्पर’ आली भारतात, या व्यक्तीने केली खरेदी

कार कंपनी बेंटलेच्या 2020 बेंटले फ्लायिंग स्पर (Bentley Flying Spur) या लग्झरी कारची भारतातील पहिली डिलिव्हरी झाली असून, गुजरात येथील उद्योगपती दीपक मावडा यांनी ही कार खरेदी केली आहे. कार फुली लोडेड असून, याची किंमत 5.6 कोटी रुपये आहे.

या लग्झरी सॅलोनमध्ये नवीन चॅसिस आणि अ‍ॅलिम्युनियमचे बॉडी पॅनेल्स देण्यात आलेले आहेत. याशिवाय कट डायमंडचे नवीन एलईडी हेडलाईट्स, 22 इंच एलॉय व्हिल्स, इलेक्ट्रिक्लने नियंत्रित होणारे लेदर सीट्स कारला आकर्षक बनवतात.

Image Credited – motor1

तसेच, इलेक्ट्रिक सनरूप, इलेक्ट्रिक सीट्स ज्यात वेंटिलेट आणि मसाज फंक्शन मिळेल. रिअर-सीट साठी डिटॅचेबल टचस्क्रीन डिस्प्ले, रिअर सेंटर कंसोलमध्ये छोटा फ्रीज देण्यात आला आहे.

Image Credited – bentleymotors

नवीन फ्लाईंग स्परमध्ये 6.0 लीटर ट्विन टर्बो डब्ल्यू 12 इंजिन देण्यात आले आहे. जे 635bhp पॉवर आणि 900Nm टॉर्क निर्माण करते. 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनद्वारे चारही व्हिल्सला पॉवर मिळते.

Image credited – bangkokpost

कारचे वजन 2.5 टन असले तरी कार 3.8 सेंकदात ताशी 100 किमीचा वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड ताशी 333 किमी आहे. 6.0 लीटर इंजिनसोबतच कंपनी लवकरच पर्यायी 4.0 लीटर ट्विन टर्बो व्ही8 आणि 3.0 लीटर ट्विन टर्बो हायब्रिड व्ही-6 व्हेरिएंट देखील देणार आहे.

Leave a Comment