जगातील सर्वात श्रींमत खेळाडूकडे आहेत 189 कोटींच्या शेकडो लग्झरी कार्स

जगातील सर्वात श्रींमत खेळाडू असलेल्या बॉक्सर प्लॉइड मेवेदरने आपल्या कारकिर्दीमध्ये कोट्यावधी रुपये कमवले आहेत. आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने सर्वच्या सर्व 50 फाईट्स जिंकल्या आहेत. मेवेदर आपल्या आलीशान राहणीमान आणि मेगा कार कलेक्शनसाठी देखील ओळखला जातो.

प्लाइड मेवेदरच्या लॉस वेगस येथील सर्व कार या पांढऱ्या रंगाच्या, तर लॉस एंजेलीस येथील सर्व कार्स काळ्या रंगाच्या आहेत. त्याच्याकडे 100 पेक्षा अधिक कार्स आहेत. या कार्सची किंमत 20 मिलियन पॉउंड्स (जवळपास 189 कोटी रुपये) आहे.

Image Credited – thesun

या कार्समध्ये 3 मिलियन पॉउंड्सची (28.30 कोटी रुपये) रॉल्स रॉयस सीरिज, 1.7 मिलियन पाउंड्सच्या (16.04 कोटी रुपये) 4 बुगाटी वेयरॉन सुपरकार्सचा समावेश आहे. मात्र या कार्सची खास गोष्ट म्हणजे या काळ्या आणि पांढऱ्या या दोन रंगातच आहेत.

Image Credited – thesun

मेवेदरची आवडती कार बुगाटी वायरॉन आहे. अशा त्याच्याकडे 4 कार्स असून, एक काळी व एक पांढऱ्या रंगाची आहे. तर इतर दोन लाल व सिल्वर रंगाची आहे.

Image Credited – thesun

या व्यतिरिक्त त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटोर (2.60 कोटी रुपये), फेरारी 488 (2.24 कोटी रुपये), रॉल्स रॉयस फँटम (3.34 कोटी रुपये) आणि क्लासिक पोर्शे 911 देखील आहे.

Image Credited – thesun

मात्र यात सर्वाधिक खास म्हणजे मेवेदरकडे महागडी बेंटले मुलसॅन आहे. ज्याची सुरूवातीची किंमत 2.25 कोटी रुपये आहे.

Image Credited – thesun

बेवेर्ली हिल्स येथील आपल्या हवेलीत या लग्झरी गाड्या ठेवण्यासाठी त्याच्याकडे मोठे गॅरेज देखील आहे. या गॅरेजमध्ये 18.57 कोटीच्या तब्बल 5 रॉल्स रॉयस आहेत. यात क्लासिक फँटम (3.5 कोटी रुपये), फँटम ड्रॉपहेड कूपे (3.46 कोटी रुपये), डॉन (2.49 कोटी रुपये), व्रेथ (3.43 कोटी रुपये) आणि कुलिननचा (2.83 कोटी रुपये) समावेश आहे. याशिवाय आणखी एक फेरारी 488 आणि 1.62 कोटींच्या मर्सिडिज मेबॅकचा देखील समावेश आहे.

Image Credited – thesun

याशिवाय काही दिवसांपुर्वीच मेवेदरने 1.46 कोटी रुपयांची मर्सिडिज जी63 एएमजी देखील खरेदी केली आहे.

Leave a Comment