रामायण, महाभारतनंतर आता ही मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी दुरदर्शनने आपल्या जुन्या मालिका रामायण आणि महाभारत पुन्हा दाखवण्यास सुरूवात केली. प्रेक्षकांनी देखील या मालिकांना भरभरून प्रतिसाद दिला असून, आता आणखी एक जुनी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तब्बल 20 वर्षांनंतर रामानंद सागर यांची श्री कृष्णा मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुरदर्शनने ट्विटवर याबाबतची माहिती दिली.

भगवान श्री कृष्णाच्या जीवनावर आधारित या मालिकेचे दिग्दर्शन सागर यांनी केले होते. सर्वात प्रथम 1993 मध्ये ही मालिका डीडी2 या चॅनेलवर त्यानंतर 1996 पासून डीडी नॅशनलवर दाखवण्यात आली होती.

या मालिकेत श्रीकृष्णाच्या तरुणपणाची भूमिका स्वप्नील जोशीने साकारली होती. तर प्रौढ कृष्णाचे पात्र सर्वादमन डी बॅनर्जी यांनी साकारले होते.

Leave a Comment