रिक्षावाल्याच्या ‘डोकॅलिटी’वर फिदा आनंद महिंद्रा, दिली नोकरीची ऑफर

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. नागरिक सोशल डिस्टेंसिंगचे देखील पालन करत आहे. याशिवाय या व्हायरसपासून वाचण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत.

असाच एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रिक्षाचालकने कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टेंसिंगचे पालन व्हावे म्हणून आपल्या रिक्षाला खास डिझाईन केले आहे. रिक्षाचे डिझाईन पाहून महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे देखील खूश झाले व त्यांनी चालकाला नोकरीची ऑफर दिली.

डिझाईन केलेल्या रिक्षाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर केला. या रिक्षाला अशा प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की कोणताही प्रवासी एकमेकांना स्पर्श करणार नाही. यात 4 प्रवासी बसू शकतात. प्रत्येक प्रवाशाला बसण्यासाठी वेगळा भाग आहे. ज्यामुळे सोशल डिस्टेंसिंगचे विशेष पालन होईल.

आनंद महिंद्रा यांना देखील डिझाईनची ही कल्पना खूपच आवडली. त्यांनी या रिक्षाचालकाला नोकरी ऑफर केली. त्यांनी ट्विट करत कंपनीचे कार्यकारी संचालक (ऑटो आणि फॉर्म सेक्टर) राजेश जेजुरिकर यांना या चालकाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीममध्ये सल्लागार म्हणून नियुक्त करण्यास सांगितले.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र हा व्हिडीओ कुठला आहे ते माहिती नाही.

Leave a Comment