अक्षय तृतीयाच्या निमित्ताने घरी बसल्या बसल्या अशी करा सोने खरेदी

अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सोने खरेदी आणि विवाह करणे शुभ समजले जाते. मात्र लॉकडाऊनमुळे मागील एक महिन्यापासून सर्व काही बंद आहे. अशा स्थितीत जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असल्यास, तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता.

देशातील अनेक रिटेलर ज्वेलरी ब्रँड अक्षय तृतीयावर सोन्याची ऑनलाईन विक्री करत आहे. यासाठी कंपन्यांनी आठवडाभर आधीच तयारी सुरू केली होती. त्यामुळे तुम्ही घरी बसल्या बसल्या सोन्याची खरेदी करू शकता व लॉकडाऊननंतर तुम्हाला त्याची डिलिव्हरी केली जाईल.

तुम्ही तनिष्कमधून ऑनलाईन दागिने खरेदी करू शकता. यासाठी कंपनी खास ऑफर देखील देत आहे. ग्राहकांना निर्मिती शुल्कावर 25 टक्के सुट देण्यात येत असून, ही ऑफर 18 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत सुरू आहे. यासाठी ग्राहकांना कंपनीची वेबसाईट www.tanishq.co.in जावे लागेल.

तनिष्कला आशा आहे की 4 मे नंतर सेवा सुरू होतील व ग्राहकांना डिलिव्हरी सुरू करता येईल. कंपनीचे म्हणणे आहे की, स्थिती सामान्य झाल्यानंतर ग्राहक स्वतः येऊन ऑर्डर केलेले दागिने घेऊ शकतात अथवा त्यांना घरपोच सुविधेचा पर्याय देखील मिळेल.

कल्याण ज्वेलर्स देखील अक्षय तृतीयाच्या निमित्ताने ऑनलाईन दागिन्यांची विक्री करत आहे. कंपनीने 21 एप्रिलपासून दागिन्यांची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे.

Leave a Comment