लॉकडाऊन : कार्यभार स्विकारण्यासाठी दोन न्यायाधीशांचा रोडने हजारो किमीचा प्रवास

लॉकडाऊनमुळे देशातील विमान आणि रेल्वे सेवा बंद आहे. अशा स्थितीत दोन न्यायाधीशांना आपला कार्यभार स्विकारण्यासाठी चक्क रोडने तब्बल 2 हजार किमीचा प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. या दोन्ही न्यायाधीशांची वेगवेगळ्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, कोलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपांकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालायत मुख्य न्यायाधीश पदभार स्विकारणार आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलासह गाडीने मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यास सुरूवात केली आहे.

तर दुसरीकडे अल्हाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बिस्वनाथ सोमाद्दर हे मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. त्यामुळे त्यांनी कोलकत्तावरून शिलाँगला कारने चालले आहेत. न्यायाधीश सोमाद्दर हे आधी कोलकत्ता उच्च न्यायालयात देखील कार्यरत होते. ते आपल्या पत्नीसह शुक्रवारी अधिकृत कारमध्ये शिलाँगच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्यासोबत कार चालक देखील असून, ते दोघेहीजण आलटूपालून कार चालवत आहेत. ते रविवारी सायंकाळी शिलाँगला पोहचण्याची शक्यता आहे.

तर न्यायाधीश दत्ता हे कोलकत्त्यावरून शनिवारी सकाळी मुंबईच्या दिशेने निघाले असून, ते सोमवारी दुपारी मुंबईत पोहण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या दोन्ही न्यायाधीशांची वेगवेगळ्या उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे.

Leave a Comment