महिलांविषयी जपानच्या मेअरच्या वक्तव्याने गदारोळ


फोटो साभार पत्रिका
जगभरात कोविड १९ मुळे लॉकडाऊन आहे. जपानच्या ओसाका या तीन नंबरच्या मोठ्या शहरातही लॉकडाऊन लागू आहे. या परिस्थितीत तेथील मेयर इचीरो मात्सुई यांनी महिलांविषयी केलेल्या वक्त्यव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून सोशल मीडियावरही चांगलाच गदारोळ माजला आहे. इचीरो यांनी महिलांसंबंधी वक्तव्य केल्यावर काही तासात ते ट्रेंड मध्ये आले आहेत.

वास्तविक इचीरो फार चुकीचे बोलले अशातला भाग नाही पण सध्या कोविड १९ च्या टेन्शनमुळे सर्वांचीच सहनशक्ती कमी झाली आहे त्यामुळे हे विधान चर्चेत आले. इचीरो इतकेच म्हटले की लॉकडाऊन काळात गरजेच्या वस्तू आणण्यासाठी पुरुषांनी घराबाहेर पडावे कारण महीला खरेदीला फार वेळ लावतात. पुरुष बाहेर पडले तर बाजारात गर्दी कमी होईल आणि कमी वेळात ते घरी परत जाऊ शकतील. मात्र फक्त जपानीच नाही तर जगातील अनेक सोशल मिडिया युजर्सना हे विधान खटकले आहे. काहींनी इचीरो यांचे विधान महिला विरोधी असल्याचे तर काहींनी असली विधाने करण्यापेक्षा देशाला करोनातून बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करायचे सल्ले त्यांना दिले आहेत.

जपान मध्ये आत्तापर्यंत कोविड १९ च्या १३ हजार केसेस आल्या असून फक्त ओसाका मध्ये १५०० रुग्ण आढळले आहेत आणि ३०० मृत्यू झाले आहेत.

Leave a Comment