अक्षयतृतीयेला पैसे न देता ऑनलाईन सोने बुकिंगची सुविधा


फोटो साभार लेटेस्टली
रविवारी अक्षयतृतीया साजरी होत आहे. हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तातील एक असून या दिवशी सोने चांदी खरेदीला विशेष महत्व दिले जाते. मात्र यंदा लॉक डाऊन मुळे सराफ बाजार बंद आहे. ही अडचण लक्षात घेऊन काही ज्वेलर्सनी ग्राहकांना मुहूर्ताची सोने खरेदी करता यावी या साठी ऑनलाईन बुकिंग सुविधा दिली आहे. त्यानुसार आत्ता पैसे न भरता सोने बुकिंग करता येणार आहे. लॉक डाऊन उठल्यानंतर पैसे भरून सोने घरी नेता येणार आहे.

काही ज्वेलर्सने याचबरोबर काही फायदेशीर ऑफर्सही ग्राहकांना देऊ केल्या आहेत. दागिने बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना पीसी ज्वेलर्सने मेकिंग चार्जेसवर ३० टक्के सूट दिली आहे. तर डायमंड दागिन्याच्या मजुरीवर २० टक्के सुट आहे. तनिष्कने मेकिंग चार्जेसवर २५ टक्के सुट देताना प्रीव्यू कोडवरून १ टक्के जादा सुट व लकी ड्रो सुविधा दिली आहे. यात लकी ड्रो जिंकणाऱ्या ग्राहकाला सोने नाणे भेट मिळणार आहे. रिलायंस ज्वेलर्सनी मेकिंग चार्जेसवर भारी सुट आणि डायमंड दागिने मेकिंगवर २० टक्के सुट दिली आहे.

यंदाच्या वर्षी गत वर्षीच्या तुलनेत सोने विक्री ८० टक्क्यांनी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गतवर्षी अक्षयतृतीयेला ३३ टन सोने विक्री झाली होती,

Leave a Comment