पासष्टी ओलांडलेल्या रेखाची ब्युटी सिक्रेट्स


फोटो साभार झी न्यूज
पासष्टी ओलांडल्याची थोडीही लक्षणे न दाखविणारी बॉलीवूड अभिनेत्री रेखा आजही सौंदर्याची खाण समजली जाते. कोणत्याही कार्यक्रमात रेखाची उपस्थिती चर्चेचा विषय ठरते. पारंपारिक कांजीवरम साडी, डोक्यात गजरा, सोन्याचे दागिने, माफक मेकअप आणि डार्क रंगाची लिपस्टिक अश्या वेशातील रेखाचे दर्शन नेहमीच ग्लॅमरस आणि तरीही ग्रेसफुल असते. अर्थात यामागे गेली चाळीस वर्षे रेखा पाळत असलेली शिस्त कारणीभूत आहे.

रेखाने स्वतःच एका कार्यक्रमात तिच्या नेहमीच्या उत्साहाचे आणि सुंदर दिसण्याचे रहस्य सांगितले होते. रेखा सांगते, ती अजिबात चिंता करत नाही हे नेहमीच्या उत्साहामागाचे कारण आहे. आणि त्वचेची काळजी घेताना क्लीन्सिंग, टोनिंग आणि मोईस्चरायझिंग नेहमी करण्याकडे तिचा कल आहे. मेकअप काढल्याशिवाय ती कधीच झोपत नाही. त्वचेसाठी कुस्करलेली केळी, बेसन, साय, मध या पासून घरीच बनविलेले फेसपॅक वापरते.

रेखाचे केस आजही दाट, काळे आणि कुरळे आहेत. ती केसांना कलर करत नाही तसेच हेअरड्रायर वापरत नाही. घरातच अंडी, दही, मध यापासून केलेले हेअरपॅक वापरते. दाक्षिणात्य असल्याने नाश्त्यामध्ये उपमा, इडलीला तिचे प्राधान्य असते तर जेवणात रोटी, सिझनल भाज्या, डाळ यांचा समावेश असतो. सायंकाळी ७ नंतर ती काहीही खात नाही. फिगर मेंटेन करण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस १ तास जिम वर्क आउट आणि बाकी वेळा ध्यान, योगासने करते. पिण्यासाठी ती कोमट पाणी वापरते. तिला सुगंधाची खूप आवड आहे. लोकांशी फार भेटीगाठी आवडत नाहीत असेही तिने सांगितले.

Leave a Comment