वाह ! ज्या शाळेत होते क्वारंटाईन त्याचाच कामगारांनी केला कायापालट

लॉकडाऊनमुळे घर सोडून विविध राज्यात कामासाठी गेलेल्या कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या कामगारांसाठी अनेक संस्था, नागरिक, गावकऱ्यांकडून राहण्याची, जेवणाची सोय केली जात आहे. मात्र हे कर्मचारी देखील त्यांना करण्यात आलेल्या मदतीची आपल्या कामाने परतफेड करत आहेत.

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील पालसाना येथे हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील 54 कामगारांची शहीद सीताराम कुमावत आणि शेठ कएल तंबी सरकारी शाळेत राहण्याची सोय केली आहे. आपल्याला करण्यात आलेल्या या मदतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कामगारांनी या शाळांना रंग देण्याची इच्छा व्यक्त केली.

यानंतर गावातील सरपंचानी सर्व सामान उपलब्ध करून दिल्यानंतर या कामगारांनी खराब झालेल्या शाळेच्या भिंतीना पुन्हा रंग देण्याचे काम हाती घेतले.

आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी याबाबतची माहिती ट्विटरवर शेअर केली.

पालसानाचे सरंपच रुप सिंह शेखावत यांनी सांगितले की, गावकऱ्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रंग देण्याची मागणी केली. त्यांच्यासाठी आम्ही सर्व सामान आणि रंग उपलब्ध करून दिले. त्यांच्या या वागणुकीमुळे संपुर्ण गाव भारावून गेले. हे सर्व लोक व्यवस्थित असून, त्यांच्या क्वारंटाईनचा कालावधी देखील समाप्त झाला आहे. आपल्या वेळेचा त्यांना असा वापर केलेला पाहणे नक्कीच आनंददायी आहे.

नेटकऱ्यांनी देखील या कामगारांचे भरभरून कौतूक केले.

Leave a Comment