आयपीएलसाठी आशिया कपमध्ये बदल करणार नाही – PCB

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आयपीएलसाठी आशिया कपच्या वेळापत्रकात कोणताही बदल करणार नसून, त्यावर बोर्ड आक्षेप घेईल असे, पीसीबीचे सीईओ वसिम खान यांनी म्हटले आहे.

खान म्हणाले की, जर कोरोना व्हायरसची कोणतीही समस्या नसल्यास यूएईमध्ये सप्टेंबर महिन्यात आशिया कपचे आयोजन केले जाईल.

एका चॅनेलशी बोलताना त्यांनी सांगितले की, आमचा निर्णय स्पष्ट आहे. आशिया कप सप्टेंबरमध्ये होणार असून, केवळ कोरोना व्हायरसचे कारण असल्यासच स्पर्धा रद्द होऊ शकते. आयपीएलसाठी आशिया कप पुढे ढकलले गेल्याचे आम्ही कधीच मान्य करणार नाही.

खान म्हणाले की, मी ऐकले की आशिया कपचे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजन करावे अशी चर्चा सुरू आहे. मात्र ते आमच्यासाठी शक्य नाही. जर तुम्ही आशिया कप पुढे ढकलत असाल तर तुम्ही एका देशासाठी जागा निर्माण करत आहात. हे चुकीचे असून, आम्ही याला कधीच पाठिंबा देणार नाही.

पाकिस्तान नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झिम्बॉम्वे आणि न्यूझीलंडसोबत मालिका खेळणार आहे. त्यामुळे आशिया कपचे तेव्हा आयोजन करणे शक्य नाही.

याशिवाय टी20 क्रिकेट वर्ल्डकपविषयी त्यांनी सांगितले की, क्रिकेट ऑस्ट्रेलियान सर्व क्रिकेट बोर्ड्सला स्पष्ट केले आहे की वर्ल्डकप दुसऱ्या देशात अथवा पुढे ढकलण्याची कोणतीही योजना नसून, सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे या वर्षी आयपीएल पुढे ढकलण्यात आले असून, कोरोनाचा प्रसार कमी झाल्यास या वर्षाअखेर आयपीएल होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment