सापाच्या या नवीन प्रजातीला दिले ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील पात्राचे नाव

भारतीय संशोधकांनी अरुणाचल प्रदेशमध्ये सापाच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. संशोधकांनी हिरव्या रंगाच्या सापाची (ग्रीन पीट व्हायपर) प्रजाती शोधली आहे.

विशेष म्हणजे या नवीन प्रजातीला हॅरी पॉटर चित्रपटातील हॉगवॉर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट आणि विझारड्रायच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सालाझर स्लीथेरिनचे नाव देण्यात आले आहे. सालाझर स्लीथेरिन हे हॅरी पॉटर चित्रपटातील लोकप्रिय पात्र आहे.

Image Credited – storypick

स्लीथेरिन हाऊसचे प्रतिक देखील साप असते. सालाझर स्लीथेरिन हे सापांशी बोलू शकतात. नवीन ग्रीट पीट व्हायपरची प्रजाती देखील स्लीथेरिन हाऊसच्या प्रतिकाशी मिळती जुळती असल्याने या प्रजातीचे नाव ‘ट्रायमेरेस्युरस सालाझर’ ठेवण्यात आले असावे.

नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस अँड बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधकांच्या टीमने या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे.

Leave a Comment