शेकडो भटक्या कुत्र्यांसाठी हे लाईफगार्ड्स ठरत आहेत ‘अन्नदाता’

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली आहे. असे असले तरी गोव्यात लॉकडाऊनचे नियम पाळले जात आहे. त्यामुळे पर्यटकांची देखील गोव्यात गर्दी नाही. अशा परिस्थितीमध्ये भटक्या प्राण्यांना समुद्रकिनाऱ्या पडलेल्या अन्नावर राहावे लागत आहे.  मात्र काही संस्था अशा प्राण्यांसाठी पुढे येत आहे.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, लाईफगार्ड्स सेवा पुरवणारी खाजगी एजेंसी दृष्टी मरिन दररोज दक्षिण गोव्याचा समुद्रकिनारा आणि जुन्या गोवा या भागातील शेकडो कुत्र्यांसाठी 30 किलो फूड आणि 30 लीटर पाण्याची सोय करत आहे.

एजेंसीचे कार्यकारी संचालक रवी शंकर म्हणाले की, बागा ते सिनक्वेरिम समुद्रकिनाऱ्याच्या दरम्यान जवळपास 200 कुत्री आहेत. ते 10-12 च्या गटात असतात. मात्र अन्न आणि पाणी मिळत नसल्याने ही कुत्री अधिक रागीट आणि अस्वस्थ झाली आहे. मात्र कोहिबा हे नाईटक्लब या कुत्र्यांना जेवण बनविण्यासाठी त्यांचे किचन वापरू देत आहे. ज्यामुळे त्यांच्यासाठी भात, मटन या गोष्टी बनवता येतात.

याशिवाय त्यांच्या सर्व 38 लाईफगार्ड टॉवर्सजवळ वॉटर स्टेशन तयार केले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर नेटकरी देखील लाईफगार्ड्सच्या या दयाळूपणाचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment