जाणून घ्या काय आहे ई-ग्रामस्वराज आणि स्वामित्व योजना

पंचायती राज दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून देशभरातील सरपंचांना संबोधित केले. यावेळी मोदींनी ई-ग्रामस्वराज पोर्टल आणि अ‍ॅपचे उद्घटान केले. सोबतच स्वामित्व योजनेची देखील सुरूवात केली.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, गावातीच इंस्फ्रास्ट्रक्चर अधिक मजबूत करण्यासाठी सरकारद्वारे हे दोन प्रोजेक्ट सुरू करण्यात आले आहेत.

ई-ग्रामस्वराज –

या  अ‍ॅपमध्ये ग्राम पंचायतचे फंड, त्यांच्या कामकाजाची संपुर्ण माहिती असेल. याच्या माध्यमातून पारदर्शकता येईल व योजनांवरील काम देखील वेगाने होईल. ई-ग्रामस्वराज अ‍ॅप पंचायतीची सर्व माहिती ठेवणारे सिंगल डिजिटल प्लॅटफॉर्म असेल. याद्वारेच पंचायतीमध्ये होणारे विकास कार्य, खर्च होणारा फंड आणि आगामी योजनेची माहिती मिळेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीला माहिती असेल की कोणती योजना सुरू आहे, त्याच्यासाठी किती खर्च आला आहे. कामामध्ये पारदर्शकता येईल.

स्वामित्व योजना –

स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक फायदे होतील. यामुळे मालमत्तेसंबंधी, जमिनीसंबंधी भ्रम, भांडण संपुष्यात येतील. गावातील विकास योजनांच्या प्लॅनिंगमध्ये मदत मिळेल.

मोदींनी सांगितले की, शहरांप्रमाणेच गावातील नागरिक देखील कर्ज घेऊ शकतील. स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनच्या मदतीने गावातील एका-एका संपत्तीची ड्रोनने मोजणी होईल. यामुळे लोकांमधील भांडण कमी होऊन, विकास कार्यांना वेग येईल. शहरांप्रमाणेच गावातील नागरिक आपल्या जमिनीवर कर्ज घेऊ शकतील. सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 6 राज्यांमध्ये ट्रायल सुरू केले जाणार असून, त्यानंतर प्रत्येक गावात याची अंमलबजावणी केली जाईल.

Leave a Comment