प्रथमच सीआरपीएफ पासिंग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार


फोटो साभार दै, भास्कर
देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाचे म्हणजे सीआरपीएफ (सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स)चा पासिंग आउट सेरेमनी प्रथमच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडत असून शुक्रवारी हा कार्यक्रम होत आहे. दर वर्षी होणारी आणि परंपरेचा भाग असलेली पासिंग आउट परेड यंदा होणार नाही. या बदलाला कारणीभूत ठरला आहे करोना आणि त्यामुळे सुरु असलेला लॉक डाऊन.

शुक्रवारी सीआरपीएफ प्रशिक्षण अकादमी कादरपूर येथे हा समारंभ होत असून त्यात ४२ थेट नेमणूक झालेले गॅजेटेड अधिकारी देशसेवेची शपथ घेणार आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी व्हीडीओच्या माध्यमातून संबोधन करणार असून त्याचे लाइव प्रसारण युट्यूब वरून होणार आहे. याची लिंक प्रत्येक ट्रेनी ऑफिसरच्या कुटुंबाशी जोडलेली आहे त्यामुळे या सेरेमनीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे कुटुंबीय सामील होऊ शकणार आहेत.

या प्रशिक्षण केंद्रात ३६० आसन क्षमता असलेल्या ऑडीटोरीयम मध्ये हा कार्यक्रम होत आहे. हा हॉल पूर्णपणे सॅनीटाईज केला गेला आहे आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. सीआरपीएफचे डायरेक्टर जनरल ए.पी. महेश्वरी अधिकाऱ्यांना शपथ देणार आहेत. पासिंग आउट परेड मधील ‘ पिलिंग ऑफ’ म्हणजे अंतिम पग परंपरा ऑडीटोरीयम मधील जिन्याच्या पायरीवर पार पाडली जाणार आहे. सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठीची निवड युपीएससी द्वारे परीक्षा घेऊन केली जाते. पास झाल्यावर ५२ आठवड्याचे प्रशिक्षण घेऊन मग असिस्टंट कमांडंट पदावर विविध युनिट मध्ये नियुक्ती केली जाते.

Leave a Comment