तीन हृदये आणि निळेहिरवे रक्त असणारा कटलफिश


फोटो साभार पत्रिका
रक्त असा नुसता शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर लालभडक रंगाचा चिकट द्रव येतो. जगातील बहुतेक सजीवांच्या रक्ताचा रंग लालच असतो पण दुसऱ्या रंगाचे रक्त असणारे काही जिवंत प्राणी पृथ्वीतलावर आहेत. एका खेकड्याच्या रक्ताचा रंग निळा असतो आणि त्याचे हे रक्त औषधी समजले आणि आणि लाखो रुपये लिटर अश्या भावाने ते विकले जाते.

समुद्रातीलाच आणखी एक जीव अश्याच वेगळ्या रक्ताचा आहे. कटलफिश असे त्याचे नाव असून त्याचे मराठी नाव आहे समुद्रफेनी. या माश्याचे रक्त हिरवेनिळ्या रंगाचे असते आणि खोल समुद्रात राहणारा हा मासा स्वतःच रंग बदलू शकतो. यामुळे समुद्रात त्याला शोधणे तसे अवघड काम आहे. अर्थात त्याच्या या हिरव्यानिळ्या रक्ताचा रंग एका प्रोटीनमुळे असतो कारण या प्रोटीन मध्ये तांब्याचे प्रमाण जास्त असते.

या माश्याचे आणखी एक विशेष म्हणजे त्याला तीन हृदये असतात आणि त्याच्यावर हल्ला झालाच तर तो इतक्या गडद रंगाचा धूर निर्माण करतो की त्यामुळे शत्रू जवळ जवळ आंधळा होतो. कणा नसलेल्या प्राण्यात हा सर्वात बुद्धिमान समजला जातो. त्याला ऑक्टोपस प्रमाणे आठ हात असतात आणि त्याचा शंख शरीराच्या आत असतो त्यामुळे तो खोल समुद्रात सहज येजा करू शकतो. कटल फिशच्या १२० जाती समुद्रात सापडतात. आंतरराष्ट्रीय बाजारात या माश्याला मोठी मागणी आहे आणि लाखो रुपये मोजून तो विकत घेतला जातो.

Leave a Comment