बॉलीवूड सेलेब्रिटी आणि त्यांचे खास टॅटू


फोटो साभार झी न्यूज
आजकाल टॅटू हा फॅशनचा अहम हिस्सा बनलेला असताना टॅटू म्हणजे एक काहीतरी डिझाईन अशी जर तुमची समजूत असेल तर ती पूर्ण चुकीची आहे. त्यात हे टॅटू बॉलीवूड सेलेब्रिटीनी त्यांच्या अंगावर गोंदवून घेतले असतील तर गोष्ट आणखीनच वेगळी. बहुतेक टॅटू प्रेमी आवड म्हणून ते गोंदवून घेत असतील पण सेलेब्रिटीचे टॅटू मात्र मनातील काही गोष्ट सांगणारे असू शकतात. अश्याच काही सेलेब्रीटींच्या या टॅटू कथा.

बॉलीवूड खिलाडी अक्षयकुमारचे टॅटू त्याचे कुटुंब हेच त्याचे सर्वस्व असल्याचे सांगतात. अक्षयने डाव्या खांद्यावर पत्नी ट्विंकलचे टीना असे नाव गोंदवले आहे तर उजव्या खांद्यावर मुलगी नितारा आणि पाठीवर मुलाचे नाव कोरले आहे. याउलट दीपिका पदुकोणने काही वर्षापूर्वी रणबीरच्या प्रेमात असताना कोरून घेतलेला आर के अक्षराचा टॅटू पुसून टाकला आहे. पण दीपिका कडे अन्य एक टॅटू आहे आणि तो पायाच्या घोट्यावर आहे. त्यात मात्र तिने स्वतः स्वतःचे नाव ‘डीपी’ असे गोंदवले आहे.

मलाइका बरोबरच्या रिलेशनमुळे चर्चेत असलेल्या अर्जुन कपूरने त्याची आई मोना हिच्या स्मरणार्थ ‘ मा’ अशी अक्षरे मनगटावर कोरली आहेत. अर्जुनचे आईवर फार प्रेम होते. मोना कपूर २०१२ साली स्वर्गवासी झाल्या आहेत. कंगना रानौतने गळ्यावर मुलीच्या रुपातील एक टॅटू काढला असून त्याला दिलेला मुकुटाकार शक्तीचे तर पंख सीमा लंघून जाण्याचे प्रतिक आहेत. तिने उजव्या गुडघ्याजवळ छोट्या परीचा टॅटू काढला असून तिला अँजल बद्दल असलेले आकर्षण त्यातून प्रतीत होते.

प्रियांका चोप्राने तिच्या मनगटावर ‘ डॅडी की लिल गर्ल’ अशी अक्षरे कोरून घेतली आहेत. प्रियांका साठी ही केवळ अक्षरे नाहीत कारण ही अक्षरे तिचे वडील अशोक यांच्या हस्ताक्षरात आहेत. प्रियांका वडिलांची फार लाडकी होती. सैफ अली खानने त्याच्या हातावर करीनाचे नाव कोरून घेतले आहे. तो त्याच्यासाठी प्रेमाचा शकुन आहे. वरूण धवन याने त्याच्या कानामागे २४ असा आकडा कोरला आहे त्यातील २ आकडा लाल रंगाचा आहे तर चार काळ्या रंगाचा. त्यामागचे कारण मात्र अद्यापी समजलेले नाही.

Leave a Comment