गोवा, मणिपूर नंतर त्रिपुरा झाले करोना मुक्त


फोटो साभार जागरण
देशात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात जीवघेण्या करोनाचा प्रभाव कमी होण्याचे नाव घेत नसताना त्रिपुरा राज्याकडून एक चांगली बातमी आली आहे. देशात गोवा आणि मणिपूर नंतर करोना मुक्त होणारे त्रिपुरा हे तिसरे राज्य ठरले आहे. २३ एप्रिल रोजी त्रिपुरा करोना मुक्त झाल्याचे राज्याचे मुख्यमंत्री विप्लव देब यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे.

राज्य करोना मुक्त झाले असले तरी राज्यातील आणि देशातील नागरिकांनी सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन देब यांनी केले आहे. करोना नियंत्रणासाठी अहोरात्र झटत असलेले डॉक्टर्स, अन्य आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार यांचे योगदान आणि त्याला जनतेने दिलेली साथ या बद्दल त्यांनी आभार मानले असून माता त्रिपुर सुंदरीच्या आशीर्वाद असाच आमच्यावर राहावा अशी प्रार्थना केली आहे.

त्रिपुरा मध्ये करोनाच्या दोन केसेस होत्या मात्र गेल्या १४ दिवसात एकाही नवी केस आलेली नाही आणि दोन्ही करोनाग्रस्त पूर्ण बरे झाले आहेत. विप्लव देब यांनी लवकरच पूर्ण भारत आणि जग करोनामुक्त होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

Leave a Comment