लॉकडाऊनचा परिणाम भारतातील 4 कोटी प्रवासी कामगारांवर – जागतिक बँक

भारतात मागील एक महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे 4 कोटी प्रवासी कामगारांवर परिणाम झाल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, भारतात लॉकडाऊनमुळे देशभरात 4 कोटी अंतर्गत प्रवाशांच्या उपजिविकेवर परिणाम झाला. मागील काही दिवसात हजारो लोक शहरातून ग्रामीण भागात गेले आहेत.

प्रवाशांच्या नजरेतून कोरोना व्हायरस संकंट नावाच्या रिपोर्टनुसार, अंतर्गत प्रवाशांचे प्रमाण आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तुलनेत अडीच पट अधिक आहे.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने आणि सोशल डिस्टेंसिंगमुळे भारत, अमेरिका सारख्या देशांमध्ये अंतर्गत प्रवाशांना परतावे लागले आहे.

जागतिक बँकेने म्हटले आहे की, सरकारने रोख रक्कम किंवा अन्य सामाजिक कार्यक्रमाद्वारे या प्रवाशांची मदत करायला हवी. या महामारीमुळे दक्षिण आशियातील आंरराष्ट्रीय आणि अंतर्गत प्रवासावर मोठा परिणाम केला आहे.

Leave a Comment