टोयोटाची छोटी एसयूव्ही ‘यारीस क्रॉस’ लाँच

टोयोटाने आपली छोटी एसयूव्ही टोयोटा यारीस क्रॉसवरील पडदा हटवला आहे. ही एसयूव्ही जिनेव्हा मोटार शोमध्ये लाँच केली जाणार होती, मात्र कोरोना व्हायरसमुळे हा मोटार शो रद्द करण्यात आला आहे. टोयोटाची ही एसयूव्ही यूरोपियन बाजारासाठी आहे.

टोयोटो यारीस क्रॉस रॅनो कॅप्चर आणि निसान ज्यूकला टक्कर देईल. टोयोटाच्या या नवीन एसयूव्हीती लांबी 4,180mm आणि व्हिलबेस 2,560mm आहे. यारिस हॅचबॅकच्या तुलनेत ही एसयूव्ही 240mm अधिक लांब, 20mm अधिक रुंद आणि 90mm अधिक उंच आहे.

Image Credited – navbharattimes

स्टाइलबाबत सांगायचे तर टोयोटा यारीस क्रॉसमध्ये सिग्नेचर टोयोटो स्टायलिंगचे काही फीचर्स देण्यात आलेले आहेत. एसयूव्हीचे व्हिल्स 18 इंच असून, यात पर्यायी इलेक्ट्रिक टेलगेट देण्यात आलेले आहेत. यारीस क्रॉस नवीन गोल्ड पेंट स्कीममध्ये येईल. हाय ग्राउंड क्लियरेंस आणि व्हिल आर्च एसयूव्हीला शानदार लूक देतात.

Image Credited – navbharattimes

टोयोटा यारीस क्रॉस एसयूव्हीचे कॅबिन यारीस प्रिमियम हॅचबॅक सारखेच आहे. सेंटर कंसोलमध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायासह फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. यात अँम्बियंट लायटिंग आणि स्प्लिट फोल्टिंग रियर सिट्स देण्यात आले आहे.

इंजिनबद्दल सांगायचे तर यात हायब्रिड इंजिन देण्यात आले आहे. यारीस क्रॉसमध्ये 1.5 लीटर, 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि 1 इलेक्ट्रिक मोटार आहे. या इंजिनचे पॉवर आउटपूट 116बीएचपी आहे.

Leave a Comment