सुवर्ण पदक विजेता बॉक्सर डिंको सिंहला एअर अ‍ॅम्बुलन्सने उपचारासाठी आणणार दिल्लीला

आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक विजेता बॉक्सर डिंको सिंहला स्पाइसजेटच्या एअर अ‍ॅम्बुलन्सद्वारे इम्फालवरून दिल्लीला आणण्यात येणार आहे. जेणेकरून त्याच्या लिव्हर कॅन्सरवर उपचार लवकरात लवकर सुरू करण्यात येतील. पद्म पुरस्काराने सन्मानित या बॉक्सरसाठी एयर अ‍ॅम्बुलन्स सेवा मोफत प्रदान केली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे डिंकोचे आधीच निश्चित झालेली रेडिएशन थेरेपी होऊ शकली नव्हती.

इम्फालमध्ये राहणाऱ्या 41 वर्षीय डिंकोची रेडिएशन थेरेपी 15 दिवसांपुर्वी होणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला दिल्ली येणे शक्य झाले नाही. यानंतर भारतीय बॉक्सिंग महासंघाने म्हटले होते की, डिंकोला 25 एप्रिलला दिल्लाला आणले जाईल व त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होतील. डिंकोला स्पाइसजेटद्वारे दिल्लाला आणण्याचा निर्णय स्पाइसजेट  आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी घेतला.

अजय सिंह म्हणाले की, लॉकडाऊनमुळे डिंको सिंहवरील उपचार थांबले होते हे खरचं दुर्देवी आहे. स्पाइसजेटसाठी आपल्या राष्ट्रीय नायकासाठी एअर अ‍ॅम्बुलन्स सेवा प्रदान करणे आणि त्याच्या उपचारासाठी इम्फालवरून दिल्लीला उड्डान घेणे अभिमानाची गोष्ट आहे. डिंकोने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. लिव्हर कॅन्सरविरुद्धच्या लढ्यात विजयी व्हावे ही प्रार्थना करतो.

दरम्यान, बॉक्सर विजेंदर सिंह आणि मनोज कुमार यांनी देखील डिंको सिंहसाठी निधी जमा करण्याचे आवाहन केले आहे. डिंको सिंह अर्जुन आणि पद्म पुरस्कारने सन्मानित असून, 1998 ला आशियाई खेळामध्ये सुवर्ण पदक देखील मिळवले होते.

Leave a Comment