स्वच्छ हवेमुळे चक्क श्रीनगरवरून दिसत आहे हिमालयाचा भाग

लॉकडाऊनमुळे देशभरात अत्यावश्यक सेवा सोडून सर्व काही बंद आहे. लोक आपआपल्या घरात बंद आहेत. याचा पर्यावरणावर देखील चांगला परिणाम पाहण्यास मिळत असून, हवा स्वच्छ झाली आहे. प्रदुषण देखील कमी झाले आहे. यातच आता श्रीनगरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये श्रीनगरमधून पीर पंजाल रेंज दिसत आहे.

पीर पंजाल रेंज हा आंतरिक हिमालयाच्या भागातील पर्वतांचा समूह आहे. जो हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मिरमध्ये येतो.

हे फोटो वसीम अंद्राबी यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले की, 23 एप्रिल 2020 ला श्रीनगरमधून पीर पंजाल रेंज दिसत आहे.

ही रेंज, सतलूज नदीच्या तटापासून हिमालयपासून वेगळी होते. एका बाजूला ब्यास आणि रावी नदीच्या मध्यभागी तर दुसरीकडे चिनाब नदीच्या मध्यभागी वेगळे होते.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या आधी जालंधरवरून हिमाचलचे पर्वत दिसत असल्याचे फोटो देखील असेच व्हायरल झाले होते.

Leave a Comment