4 वेळा आयव्हीएफनंतर 68 वर्षीय महिलेने दिला जुळ्यांना जन्म

नायजेरियामध्ये एका महिलेने 4 वेळा आयव्हीएफ केल्यानंतर जुळ्या बाळांना जन्म दिल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या महिलेचे वय 68 वर्ष आहे.

या महिलेचे नाव मार्गरेट अडेनुगा असून, त्यांना लागोसच्या एका हॉस्पिटलमध्ये 14 एप्रिलला एक मुलगा आणि मुलीला जन्म दिला.

महिलेचे पती अडेनुगा यांनी सांगितले की, पत्नी मागील वर्षी गर्भवती झाली. या आधी 3 वेळा आयव्हीएफचा काहीही परिणाम झाला नव्हता. आम्ही आशाच सोडून दिली होती.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, पतीने सांगितले की त्यांना 1996 मध्ये एक स्वप्न पडले होते. त्यात त्यांनी पाहिले की संपुर्ण जगात त्यांना ओळख मिळाला आहे. ते सांगतात की, मी एक ड्रिमर आहे. मला विश्वास होता की एकेदिवशी हे स्वप्न खरे होईल.

डॉक्टर अडेयेमी ओकुनोव्हो यांनी सांगितले की, महिलेचे वय जास्त असल्याने व पहिल्यांदाच आई बनणार असल्ये मोठा धोका होता. दोन्ही बाळ सिजेरियन ऑपरेशनद्वारे जन्माला आली. आई व दोन्ही बाळ व्यस्थित आहेत.

Leave a Comment