व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देणार जिओमार्ट

व्हॉट्सअ‍ॅप आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांना रिलायन्स रिटेलचे ई-कॉमर्स वेंचर जिओमार्टद्वारे टक्कर देणार आहे. याबाबतची माहिती फेसबुक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये झालेल्या भागीदारी दरम्यान देण्यात आली.

फेसबुक जिओ प्लॅटफॉर्ममध्ये तब्बल 43,574 कोटी रुपये गुंतवणार आहे. या भागीदारीद्वारे फेसबुक जिओ प्लॅटफॉर्मद्वारे भारतात आपला विस्तार करणार आहे.  कंपनीसाठी भारतात 480 मिलियन कनेक्टेड युजर आहेत. रिलायन्स रिटेलने जानेवारीमध्ये जिओमार्टला नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या भागांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरूवात केले होते.

रिलायन्स आणि फेसबुकच्या या भागीदारीमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने जिओमार्टद्वारे ग्राहकांना जवळील स्टोरमधून सामान घरपोच सेवा दिली जाण्याची शक्यता आहे. जिओ मार्ट प्लॅटफॉर्मकडे भारतीय ग्राहकांसाठी छोटे व्यापारी आणि किराणा स्टोर्स आहेत. मात्र व्यापक स्वरूपात याचे संचालन होणे बाकी आहे.

Leave a Comment