लॉकडाऊन : 2 दशकात भारतात पहिल्यांदाच सर्वात कमी प्रदूषण, नासाने जारी केले फोटो

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असला तरी देश मात्र प्रदुषणमुक्त होत आहे. नद्या स्वच्छ होत आहेत. हिमालय जालंधरवरून दिसत आहे. लॉकडाऊनमुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात चांगला परिणाम होताना पाहण्यास मिळत आहे. नासाने देखील याबाबतची पुष्टी केली आहे.

नासाच्या अर्थ ऑब्जरवेटरीने भारताचे मागील 4 वर्षातील फोटो जारी केले आहेत. ज्यात भारतातील प्रदुषण कसे कमी झाले आहे, ते सांगितले आहे. लॉकडाऊनमुळे वाहनांचा आवाज देखील नाहीसा झाला आहे. फॅक्ट्री देखील बंद आहेत. लॉकडाऊनमुळे देशातील एयरोसोलचे प्रमाण कमी झाले आहे. नासाच्या अर्थ ऑब्जरवेटरीच्या टीमने याचा अभ्यास केला आहे.

नासाने हे फोटो मॉडरेट रिझॉल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडियोमीटर टेरा सॅटेलाईटद्वारे घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतातील प्रदुषणाची समस्या नाहीशी झाली आहे.

नासाने म्हटले आहे की, भारतातील प्रदुषणाचा स्तर कमी झाला आहे. एयरोसोलचे ढग नाहीसे झाले आहे. नासाच्या सेटेलाईट सेंसरने भारताचे जे फोटो काढले आहेत, ते आश्चर्यकारक आहेत. 2016 पासून ते आतापर्यंतचे फोटो पाहून प्रदुषणातील फरक त्वरित लक्षात येतो.

नासानुसार, उत्तर भारतात हवेचे प्रदुषण सर्वाधिक निचांक पातळीवर आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर उत्तर भारतातील हवेतील प्रदुषणाच्या कणांचा स्तर कमी झाला आहे.

नासाच्या मोडिस एयरोसोल प्रोडक्ट्सचे प्रोग्राम प्रमुख रॉबर्ट लेव्ही म्हणाले की, भारतात हवा स्वच्छ होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. केवळ हवाच नाही तर जमीन, पाणी देखील स्वच्छ झाले आहे. भारताने असे प्रयत्न करायला हवे ज्याद्वारे वातावरण एवढे स्वच्छ राहील.

Leave a Comment