श्रीमंतांच्या विरंगुळ्यासाठी कोट्यावधींच्या ब्रेसलेटचा लिलाव

कोरोना व्हायरस महामारीमुळे जगभरात सध्या लॉकडाऊन आहे. नागरिक घरात कैद आहेत. अशा स्थितीत वेळ घालवण्यासाठी, मनोरंजनासाठी नागरिक वेगवेगळे मार्ग शोधत आहे. मात्र या काळात श्रींमत लोक मनोरंजनासाठी कोट्यावधी रुपयांचे दागिने खरेदी करत असल्याचे समोर आले आहे.

सोथेबाय्स या लिलाव कंपनीच्या मॅग्निफिशंट ज्वेलसच्या विक्री तज्ञ कॅथेरीन बॅकेट या मागील 5 वर्षांपासून 1930 च्या दशकातील खास हिरे आणि कार्टियरच्या इनामेल ब्रेसलेटच्या शोधात होत्या. अखेर कॅथेरीन यांच्या एका ग्राहकांने लिलावात हे ब्रेसलेट विकण्याची परवानगी दिली आहे. हे ब्रेसलेट टुटी फ्रुटी म्हणून ओळखले जाते.

कॅथेरीन यांच्यानुसार, लॉकडाऊनमुळे आणि अर्थव्यवस्था संकटात असल्या कारणाने लाईव्ह लिलाव करणे टाळून दागिन्यांच्या ऑनलाईन विक्री करण्याचा सोथेबाय्सने निर्णय घेतला. विशेष म्हणजे या ऑनलाईन विक्रीला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.

कॅथेरीन यांनी सांगितले की, श्रींमत लोक घरात एकटे आहेत आणि कंटाळले आहेत. ते घरात आनंद मिळण्यासाठी हिऱ्यांचे दागिने घालत आहेत.

मार्चपासून सोथेबॉय्सने 4 वेळा दागिन्यांची ऑनलाईन विक्री केली आहे. त्यातील प्रत्येक वेळी 92 टक्के वस्तूंची विक्री झाली आहे. लॉकडाऊनच्या आधीच्या महिन्यांपेक्षा ही विक्री कितीतरी अधिक आहे. याद्वारे त्यांनी जवळपास 6.1 मिलियन डॉलर्सची (जवळपास 46.41 कोटी रुपयांची) कमाई केली. त्यांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम कितीतरी पटींनी अधिक होती.

बॅकेट यांनी सांगितले की, आम्हाला आढळून आले की चांगल्या गुणत्तेच्या वस्तूंची चांगली विक्री विक्री होते. 1930 च्या दशकातील एका डायमंड रिंगची तब्बल 1,62,000 पाऊंडला (1.52 कोटी रुपये) विक्री झाली. पिवळी डायमंड रिंगची जवळपास 1.96 कोटींना तर ग्राफच्या इर्मेलँड आणि डायमंड एअररिंग्सची जोडी 47 लाख रुपयांना विकली गेली.

याशिवाय खास कार्टियरच्या टुटी फुटी ब्रेसलेटची ऑनलाईन विक्री केली जाणार आहे. यासाठी 24 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान ऑनलाईन बोली लावली जाणार असून, याची अंदाजे किंमत 4.56 कोटी ते 6.08 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Leave a Comment